दोन वर्षापासून गाजत असलेला बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीवरील पुलाची दुरावस्थेच्या बाबतीतला मुद्दा अनेकांनी लावून धरला. जवळपास दि.१ नोव्हेंबर २०२२ पासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली.
२७|२८ दिवस झाले.आता काम पुर्ण झाले आहे.शासनाकडून दखल घेऊन कंधार येथील शासकीय गुत्तेदार वैजनाथराव सादलापुरे यांना काम देवून काम दर्जेदार झाले.सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंधारचे अभियंता जोशी सर व अभियंता सुनील सादलापूरे यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.
सुपरवायझर संजय पाटील व केशव जाधव यांच्या देखरेखीत काम पुर्ण करतांना लेबर गुत्तेदार सय्यद नबी सय्यद मीर, प्रमोद फूलवळकर,गुंडाजी गायकवाड, चंद्रकांत नामपाठक, शेख अजीज, गुरुनाथ एमेकर, पप्पू बिजेवाडीकर, सय्यद जमीर,सय्यद मुजम्मीर, यांनी आपापल्या पध्दतीने हातभार लावून काम पुर्ण केले.आज २७ नोव्हेंबर २०२२रोजी काम झाल्यामुळे पुल रहदारीस खुला झाला.