दोन्ही पाय निकामी झालेला कामगार विठ्ठल कतरे २३ वर्षा पासून मदतीविना ..!

कंधार ; दिगांबर वाघमारे

मराठवाड्यातील ढोकी नंतर दुसरा सहकारी साखर कारखाना आता खाजगी मालकीचा झाला आहे.पण या कारखान्यात काम करणारा कामगार विठ्ठल कोंडीबा कतरे यांचे कारखान्यात काम करताना १९९९ मध्ये दोन्ही पाय गुडघ्या पासून निकामी झाले .

मदत मिळावी म्हणून विठ्ठल याने न्यायालय धाव घेतली. सरकार आले गेले..प्रशासक आले गेले..पण विठ्ठल मात्र मदतीपासून वंचित राहिला नुकसानभरपाई मिळावी यासाठी गेल्या २३ वर्षा पासून “शासकीय कार्यालयाचे खेटे मरणाऱ्या विठ्ठलने मदतीसाठी ५ डिसेंबर रोजी
जिल्हाधिकारी कार्यालया समोर तहसील प्रशासनच्या विरोधात उपोषण करणार आहे .

कलंबर कारखान्याचा कामगार विठ्ठल कोंडीबा कतरे हे (१९९९ ) काम करीत असताना दोन्ही पाय मशीन मध्ये अडकून निकामी झाले.आयुष्यभर विकलांग झाला
उपासमारीची वेळ आली नुकसानभरपाई द्यावी म्हणून पीडित कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाकडे दाद मागितली परंतु कारखान्यांनी दखल घेतली नसल्याने पीडित कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली .

न्यायालयाने उपविभागीय अधिकारी कंधार व तहसीलदार लोहा यांना आदेश काढून कारखान्याच्या मालमत्ते चा लिलाव करून त्या लिलावातून मिळणाऱ्या पैशातून पीडित दिव्यांग कतरे या लाभार्थ्यांला नुकसानभरपाई द्यावी असा आदेश दिला .

तहसीलदार यांनी कारखान्याच्या मालमतेतील भंगार वाहन जमीन यांचा लिलाव केला या लिलावाची रक्कम ही तहसील कार्यालयात जमा झाली परंतु तेवीस वर्षे झाली अद्याप पीडित कर्मचाऱ्याला नुकसानभरपाई मिळाली नाही तात्काळ नुकसानभरपाई मिळावी यासाठी 5 डिसेंबर रोजी आमरण उपोषण करणार आहे तसे निवेदन दिव्यांग पीडित कर्मचारी विठ्ठल कतरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे .

दोन्ही पाय निकामी…मदत ही दूरच
— ——– –

कलंबर साखर कारखानातील कामगार विठ्ठल कोंडीबा कतरे दोन्ही पाय गुडघ्या पासून कायमचे निकामी झाले
नुकसानभरपाई साठी त्यांनी 1999 मध्येच न्यायालयाततली न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2002 मध्ये नुकसानभरपाई पोटी पीडित कतरे यांना एक लक्ष 61 हजार मूळ रक्कम व त्यावर 12 टक्के व्याज अशी आदांजे रक्कम रुपये 5 लक्ष 56 हजार इतकी रक्कम आजच्या घडीला देणे होते

 

कारखानावर आवसायक होते .मधल्या काळात
.भांगर विक्री झाली, जमीन गट क्रमांक ८७० मधील काही जमीन नॅशनल हायवे मध्ये गेला त्याची ३४लक्ष रुपये आले पण विठ्ठल तसाच राहिला आता कारखाना विकला त्यामुळे मदत तात्काळ मिळावी यासाठी पीडित कतरे विठ्ठल यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी निवेदन दिले .

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 डिसेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *