भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व समानता प्राप्त करून देण्याच्या अनुशंगाने दि. 26 नोव्हेंबर,1949 रोजी भारताची राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केली. सदर राज्यघटना दि. 26 जानेवारी,1950 पासून अंमलात आली. भारतीय संविधानाची माहिती देशातील नागरिकांना व्हावी तसेच संविधानानुसार काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील अधिकारी/कर्मचारी यांना पोहोचविण्यात यावी यासाठी संविधान दिन साजरा करण्यात येतो. संविधानाने शासकीय, न्यायिक अर्धन्यायीक इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या त्या संविधानाची ओळख सर्वांना करून देण्याच्या अनुशंगाने राज्यात दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 26 नोव्हेंबर, संविधान दिन ते 06 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व आयोजित करण्यात येत आहे. शासन निर्णय शासन परिपत्रक क्रमांक: सान्यावि-2022/प्र.क्र.229/बांधकामे दिनांक: 25 नोव्हेंबर 2022