शहरातील मुख्य रस्त्यावर उभी मोटार सायकल अज्ञात चोरट्यानी पळवली ; कंधार पोलिसात गुन्हा

कंधार ; शहरातील मुख्य रस्त्यावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातून होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरटयांने चोरून नेली .

दि.२८ रोजी कंधार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ता. कंधार जि. नांदेड येथे,सचिन भाऊराव वाघमारे यांनी मोटार सायकल काही खाजगी कामानिमित्य उभी करून गेले होते .

ही संधी साधून कोणीतरी अज्ञात चोरटयाने ती मोटार सायकल पळवली .सुमारे 50,000/- रुपये किंमतीची मोटार सायकल होती .

सचिन भाऊराव वाघमारे यांनी फिर्यादवरुन कंधार पोलिसान गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ सानप, हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *