Post Views: 56
नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या राज्याध्यक्षपदी ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांची निवड करण्यात आली असून राज्य उपाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक पांडूरंग कोकुलवार, महासचिवपदी कैलास धुतराज तर महिला विभाग प्रमुख म्हणून रुपाली वागरे वैद्य यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष रणजीत गोणारकर, किशनराव लोखंडे, ज्येष्ठ साहित्यिक तथा मंडळाचे माजी अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, स्तंभलेखक भैय्यासाहेब गोडबोले, बालाजी मांजरमकर, सप्तरंगी कला व साहित्य मंडळाचे शंकर धोंगडे, ज्येष्ठ कवी थोरात बंधू आदींची उपस्थिती होती. विविध साहित्य चळवळींच्या माध्यमातून दिलेल्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने नागोराव डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या राज्य कार्यकारिणीची एक महत्वपूर्ण बैठक माजी राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात राज्य कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या राज्याध्यक्षपदी उमरी रे. स्टे. येथील ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर राज्य कार्यकारिणीत राज्य उपाध्यक्ष – पांडूरंग कोकुलवार, महासचिव – कैलास धुतराज, कार्यालयीन सरचिटणीस – मारोती कदम, कोषाध्यक्ष – शंकर गच्चे, कार्याध्यक्ष – प्रज्ञाधर ढवळे, वरिष्ठ सल्लागार – अनुरत्न वाघमारे, रुपाली वागरे – महिला विभाग प्रमुख, राज्य संघटक – प्रशांत गवळे, राज्य समन्वयक तथा संपर्क प्रमुख – बाबुराव पाईकराव हिंगोली परभणी प्रभारी, कायदेशीर सल्लागार – अॅड. विजय गोणारकर, मुख्य सल्लागार – डॉ. जगदीश कदम यांचा समावेश आहे.