Skip to content
Post Views: 79
लहानपणी बापाच्या खांद्यावर वाढलो
मोठं झाल्यावर मात्र बापापासुनच लांबलो
परंतु, बाप कधी कळलाच नाही..!
बापानं आपल्या जीवाचं रानं केलं.
मुलाबाळांच्या जीवनाचं त्यानं खरं सोनं केलं.
परंतु, बाप कधी कळलाच नाही..!
स्वतःच्या पोटासाठी गाठी बांधून उपाशी राहिला.
काळजाच्या तुकड्याला त्यानं तुप रोटी दायीला.
परंतु, बाप कधी कळलाच नाही..!
आभाळा एवढं प्रेम आपल्या बापाचे.
मग बापाविरोधी का बरं षड्यंत्र असे पापाचे.
परंतु, बाप कधी कळलाच नाही..!
कष्टकरी बाप माझा शेतात राबराब राबायचा.
घरी आल्यावर सर्वांशी मात्र, ताणतणाव विसरायचा
सर्वांशी मात्र आनंदाने वागायचा.
परंतु, बाप कधी कळलाच नाही..!
बाप आपल्या मनात, धाडस निर्माण करून देतो
मात्र आपण मनात, खोडस निर्माण करून घेतो
परंतु, बाप कधी कळलाच नाही..!
लेखक:
– युवा साहित्यिक: सोनू दरेगावकर, नांदेड..!