कंधार कंधार तालूक्याचे भुषण असलेले मिनी पंढरपुर समजल्या जाणारे ह.भ.प.गुरुवर्य एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या पुण्यभुमीत भुत्ते पाटील परिवाराच्या मुंडासे कार्यक्रम निवेदक म्हणून वंदनीय गुरुवर्य संत नामदेव महाराज यांच्या पुण्यभुमीत जि.प.शाळेच्या चिमुकल्यांना दिले अक्षरांचे धडे योग आला.म्हणून कार्यक्रमास वेळ होता.त्या वेळेचा उपयोग घेत तेथील जि.प.प्राथमिक शाळा उमरज,ता.कंधार येथील चिमुकल्यांना मराठी आणि इंग्रजी कर्रस्यूव्ह रायटिंग, कल्पक अक्षरे, कला,हसत खेळत शिक्षण यांचे धडे शहरातील विद्यार्थ्यांना शिकवणी लावून मिळविता येते,पण..खेड्या- पाड्यातील चिमुकल्यांना अक्षर सुंदर कसे करावे याचे प्रात्यक्षिक करुन घेतांना चिमुकल्याच्या चेहर्यावर हस्य फुलल्याने मला मनस्वी आनंद वाटला. आमच्या श्री शिवाजी हायस्कूल कंधार या ज्ञानालयात विद्यार्थ्यांना हे रोजच मिळते. फक्त अर्धा तास जि.प. प्राथमिक शाळा उमरज येथे संत नामदेव महाराज मठ संस्थानात अध्यात्म व मृदंग, टाळ,वीणा,तबला शिकण्यास येणाऱ्या लेकराच्या सानिध्यात रमल्याने विद्यार्थ्यां अक्षर लळ्यात रमुण गेले.अक्षर धडे घेतल्या नंतर निरोप घेतांना बाय-बाय अन् जयक्रांति करुन मला निरोप दिला.खरच मला संधी मिळाल्याने मी ज्या गावात कार्यक्रमा निमित्त जातो तेथे पहिल्यांदा शाळेला भेट देण्याचा माझा छंद आहे.गुडमेवार सर,नागरगोजे सर,पेन्शनवार मॅडम यांनी खुप सहकार्य केले.चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत एक आठवणीचे छायाचित्र सहशिक्षक बालाजीराव गुडमेवार सर यांनी टिपले. यावेळी आदरणीय मुख्याध्यापक तानाजीराव कुट्टे सर, बालाजीराव गुडमेवार सर, नागरगोजे पी.डब्लू सर, एम.एच. माळाकोळीकर सर, सोमासे पी.एस सर, जाधव बी.एम. सर, सौ.शुभदा पेन्शनवार मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते