लोहा ; विनोद महाबळे
धुळे येथील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी कारणीभूत अब्दुल सत्तार व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा राजीनामा घेणे व जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करून गुन्हे दाखल करावे यासाठी दि.२८ रोजी लोहा तहसील कार्यालय येथे युवा भाजपा नेते नांदेड चे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक भास्कर पाटील पवार, पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड, पारडीचे उपसरपंच शरद पवार, शाळा समिती अध्यक्ष विठ्ठल डीकळे, सूर्यकांत गायकवाड, भानदास पवार, ज्ञानेश्वर भिसे,विजय केंद्रे, विश्वनाथ डीकळे, विश्व पोषट, अमोल कांबळे आदींची उपस्थिती होती.