कंधार पोलीस स्टेशनच्या वतीने दर्पण दिनी पत्रकारांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

कंधार पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक राम पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व माध्यमाच्या पत्रकारांचा ६ जानेवारी दर्पण दिनानिमित्त  दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कंधार येथील पत्रकारांचा सत्कार आयोजित करण्यात आला .

 

यावेळी पोलीस विभागाचा वर्धापन दिन व पत्रकारांचा ६ जानेवारी दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा देऊन पत्रकार  समाजाचा तिसरा डोळा असल्याने पोलिस आणि पत्रकारामध्ये नातं मैत्रीचा असावा असे आवाहन राम पडवळ यांनी केले .

 

या सत्कार प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ उंदराळे , पोलीस उपनिरीक्षक गणाचार्य , तुकाराम जुने , शेख इमरान , दिगंबर भंडारे , महागावकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच गौतम कांबळे आदीसह पोलीस बांधवांची उपस्थिती होती .

 

या सत्कार कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार दिनकर जायेभाये  आहे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट दिगंबर गायकवाड , वाघमारे डी जी , सत्यनारायण मानसपुरे , मोहम्मद  अनसारुद्दीन , माधव भालेराव , एस पी केंद्रे , राजरत्न गायकवाड , विश्वंभर बसवंते , महंमद सिंकदर , दयानंद कदम , सय्यद हबीब , माधव गोटमवाड , मुंडे , शेख  आदी सह शहरातील पत्रकारांची उपस्थिती होती

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *