कंधार येथिल पत्रकार गणेश कुंटेवार यांना कै माधवराव आंबुलगेकर पत्रकार पुरस्कार  प्रदान

कंधार

दै सामना वृत्तपत्राचे कंधार तालुका प्रमुख तथा मा नगरसेवक, जिल्हा संघटक गणेश भाऊ कुंटेवार यांना कै माधव अंबुलगेकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मिनी सहयाद्री विश्रामगृह नांदेड येथे प्रदान करण्यात आला.

मिमांसा फाउंडेशन मिडीया  , पोलीस सोशल क्लब , पत्रकार प्रेस परिषद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रुपेश पाडमुख यांच्या सह टिमच्या वतीने 5 जानेवारी रोजी राज्यासह जिल्हातील पत्रकारांचा पुरस्कार वितरण सोहळा मिनी सहयाद्री विश्रामगृह नांदेड येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . सामना वृत्तपत्राचे कंधार तालुका प्रमुख तथा मा नगरसेवक, जिल्हा संघटक गणेश भाऊ कुंटेवार यांना कै माधव अंबुलगेकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला .

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कंधार चे तालुकाध्यक्ष मिर्झा जमीर बेग , दिगांबर वाघमारे , प्रा भागवत गोरे , माधव भालेराव , एस पी केंद्रे , महमद सिंकदर आदी सह पत्रकार उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *