भाजपा युवा मोर्चा कंधार शहराध्यक्ष पदी शिवम महाजन यांची निवड

भाजपा युवा मोर्चा कंधार शहराध्यक्ष पदी शिवम मुकुंद (बाळू)महाजन यांची निवड करण्यात आली .भारतीय जनता पार्टी ता.कंधार आयोजित कार्यसमिती आढावा बैठक सदर निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले .

भारतीय जनता पार्टी ता.कंधार आयोजित कार्यसमिती आढावा बैठक आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंधार येथील संपर्क कार्यालयात पार पडली.

यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणिताताई देवरे चिखलीकर,भाजपा जिल्हा सरचिटणीस गंगाधररावजी जोशी यांनी सुद्धा यावेळी संवाद साधला.

यावेळी प्रदेश पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख,व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजपा युवा मोर्चा कंधार शहराध्यक्ष पदी शिवम मुकुंद (बाळू)महाजन यांची निवड करण्यात आली . या निवडी बदल सर्वेत शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *