पृथ्वीतलावर मानव अस्तित्वात आला त्यावेळेस पासून आज पर्यंत मानव अन् प्राण्यात अतुट प्रेमभाव जपणारे नाते अतुट आहे.त्यातल्या त्या श्वान प्राणी हा इमानदारी जोपासणारा मुका पण नासिकारंध्रावर गंधाचे प्रभुत्व असणारा एकमेव प्राणी. ४ डिसेंबर २०२२ पासून महाराष्ट्राची मुलुखमैदानी तोफ, मन्याड खोर्याचा ढाण्या वाघ,मुक्ताईसुत वंदनीय दिवंगत डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब संभाजी नगर (औरंगाबाद) येथील एम.जी.एम हाॅस्पिटल मध्ये जवळपास एक महिना काळासोबत दोन हात करत झुंज देत होते.पण नियतीने घाला घातला.अन् १ जानेवारी २०२३ या नवर्षाचा जल्लोष सर्वत्र साजरा होतांना मन्याड खोर्यातील ढाण्या वाघाला आपल्या कवेत घेऊन गेली.अख्ये मन्याड खोरेच नव्हे अख्या भारत देशावर शोककळा पसरली.लोकसभा वास्तूने दु:खाश्रू ढाळले.
महाराष्ट्र विधानसभा वास्तू आपला सदस्य आपल्यास सोडून गेल्याने ढसाढसा आसवे गाळली.गंगथडीचा मराठवाडा पोरका झाल्याने गोदामायीस आसवांचा महापूर आला.मन्याड खोर्याने अक्षरश: धायमोकलून हंबरडाच फोडले.कंधार नगरीच्या ऐतिहासिक छ. शिवाजी चौकाने आपल्या रांगड्या वाणीने करोडो लोकांवर गारुड घालणारे लाल खंदारी व्यक्तीमत्व जणुकांही हरवल्यागत मनाने चलबिचल झाले.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीचा बावन्नकशी प्लॅटीनमचा दागिणा हरवल्यागत बेचैन झाला.
श्री व्दादशभुदेवी सर्वलोकाश्रय मंडप मुक्ताईप्रभा निवासस्थानाने चक्क अंथरुण धरले.करोडो चाहते दु:ख सागरात बुडाले. मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या अर्ध पुतळा आपल्या बाळ केशवांच्या जाण्याने दु:ख वियोगाने मुर्छीत झाला. एवढ्यावरच हे सर्व थांबले नाही.तर दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी अनेक जिवाभिवाचे सहकारी शेकडो नव्हे लाख्खो कमविले.प्रत्येक पुरुष व महिला यांना दु:ख अनावर होवून प्रत्येकांनी आपल्या भावनेला अश्रू रुपाने वाट एवढ्यावरच न थांबता त्यांनी हे निसर्ग,वृक्ष,प्राणिमात्रांना जिवापाड लढा लावला.त्यांचे श्वान प्रेम अख्या नंदीग्राम जिल्ह्यात परिचित होते.राणा आणि ज्युली या श्वानाच्या जोडीने आपल्या मालकांचे दर्शन इतके दिवस का झाले नाही? आपल्या मालकांना न पाहता एका महिन्याचा कालखंडात गेला भेट झाली नसल्यामुळेच .
२ आणि ३ जानेवारी २०२३ या दोन दिवस मुक्ताई प्रभा निवासस्थानी सर्वच सदस्य व्यस्त होते.म्हणून आज दि.४ जानेवारीस सकाळी डाॅ.भाई धोंडगे साहेब यांचे कनिष्ठ सुपुत्र प्रा.डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे आणि डाॅ.भाई साहेब यांच्या सुकन्या प्रा.चित्राताई दिगंबरराव लूंगारे (कंधार) व सौ.भारिरथा तातेराव आहेर (परभणी) मुक्ताईसुताची सुश्रूषा करणारे माधवराव आंबटवाड सर,डॉ.भाई धोंडगे साहेबांचे शिषोत्तम दत्तात्रय एमेकर गुरुजी,अँड डाॅ.प्रकाश डोम्पले सर, प्रशांत कलमे सर उपस्थित होते.
नंतर त्यांना स्विमिंग टॅकच्या जाळीत बंदिस्त केल्या नंतर माऊली हाॅस्पिटलचे डाॅक्टर शिवाजीराव शिंदे, त्यांचे चिरंजीव आणि प्रा.सुधाकर कौसल्ये उपस्थित झाले.हे सर्व जण डाॅ.भाई धोंडगे समाधीस्थळा समिप बसलो होतोत.त्यावेळेस ज्युली व राणा यांना डाॅ.भाई धोंडगे यांची सूश्रूषा करणारे दत्ता सुखदेव यांनी व बंदुके यांनी श्वानांना सोडताच ज्युली (मादी श्वान) व राणा (नर श्वान) यांनी आपल्या पट्टापकड वीरांना खेचतच डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या समाधीस्थळी फरकडत आणले. आणि हंबरडा फोडून दुःखाश्रू गाळू लागले.
या क्षणाचे व्हिडिओ चित्रीकरण मोबाईल तांत्रिक बिघाडामुळे लाइव टिपता आला नाही याचक खंत वाटते आहे. त्यावेळेस प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी त्या मुक्या श्वानाचे सांत्वन केले.त्यावेळेस त्यांनी आपला वियोग आवरता घेतला.