शिक्षक मतदारसंघ निवडणुक मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांनी शासनाच्या लिंकचा वापर करावा- परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अनुपसिंह यादव यांचे आवाहन

कंधार ; प्रतिनिधी ..दि. 30 जानेवारी 2023 रोजी सोमवारी 5- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुक 2023 करीता मतदान होणार आहे. नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रावर (Polling Booth) आहे. याची माहिती सुलभतेने व्हावी या करिता, याबाबत ची सुविधा मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयाने तयार केलेल्या https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी कंधार तालुक्यातील मतदारांनी या लिंकचा वापर करावा. जेणे करुन दि. 30 जानेवारी 2023 रोजी सोमवारी मतदानाच्या दिवशी कोणत्याही मतदारास आपले मतदान केंद्र कोणते आहे हे शोधण्यासाठी फिरावे लागणार नाही तरी सदरील लिंक चा वापर कंधार तालुक्यातील औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदारांनी वापरावे असे अहवाल मा. अनुपसिंह अरुणकुमार यादव सहाय्यक पदनिर्देशीत अधिकारी कंधार तथा परि. उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार कंधार यांनी केले आहे
कंधार तालुक्यातील चार मतदान केंद्रावर मतदान होणार आहे .
1)प्रियदर्शनी हायस्कूल (मुलींचे) कंधार. (एकूण मतदार संख्या 421)
2) जिल्‍हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा कुरूळा (एकूण मतदार संख्या 143)
3) जिल्‍हा परिषद माध्यमिक शाळा पेठवडज (एकूण मतदार संख्या 160)
4)जिल्‍हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा उस्माननगर (एकूण मतदार संख्या 152

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *