गऊळ तालुका कंधार गावच्या दांडावरील महादेवचा सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमदभागवत कथा ज्ञानवस सोहळा . सप्ताह सहावा दिवसात आहे. श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने एका माळावर वैभव फुलले आहे.
महाराजांची लीला फारच होती. नवसाला पावणारा हा महादेव आहे. गऊळ पंचक्रोशीतील अनेक भक्त श्री भागवत कथा ऐकण्यासाठी दुरून येत असतात.
भागवताचार्य ह.भ.प.सौ आशाताई सुनिल राऊत लातुरकर यांनी आपल्या वाणीतून आपल्या सहाव्या दिवसाच्या सेवेतून मंत्रमुक्त केले आहे.गऊळ,फकिरदरावाडी ,भोजूची वाडी, मानसिंग वाडी,चोळीतांडा,लिंबाताडा, पटाचा तांडा,
श्री ज्ञानेश्वर गणपतराव पितळे आजच्या दिवसाच्या महाप्रसादाचे अन्नदाते. आजुबाच्या परिसरातील हजारो भावीक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.