काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षपदी नुकतीच माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई संजय भोसीकर यांची निवड झाली असल्याने फुलवळ मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा माहेर च्या भूमीत यथोचित सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या तेंव्हा आभार व्यक्त करतांना सौ. वर्षाताई भोसीकर म्हणाल्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने मागच्या काळात फुलवळ गटाचे जि.प.सदस्या म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जर पक्षाने फुलवळ गटातून निवडणूक लढवण्याचे आदेश व संधी दिली आणि जनतेने आशीर्वाद दिले तर जनसेवेचा वसा पुन्हा पेलण्याचा या मकर संक्रांत निमित्ताने संकल्प केला असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर , फुलवळ पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वंभर बसवंते, धोंडीबा बोरगावे, मधुकर डांगे, शादुल शेख, परमेश्वर डांगे, बसवेश्वर मंगनाळे, सरपंच प्रतिनिधी नागनाथ मंगनाळे,आनंदराव पवार, मन्मथ मेळगावे , विश्वनाथ पटवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की यापूर्वी च्या काळात जेंव्हा आपण मला जि.प. सदस्य म्हणून निवडून दिलात तेंव्हा तत्कालीन अधिकारी , पदाधिकारी , कर्मचारी यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करत केलेले सहकार्य मी कधीच विसरू शकत नाही असे म्हणत सुमंत भांगे , शरद कुलकर्णी , मिलिंद व्यवहारे यांचा आवर्जून उल्लेख केला. तसेच फुलवळ सर्कल मधील सर्व पत्रकार बांधवांनी वारंवार विविध उपक्रमांना व केलेल्या कामांना दिलेल्या प्रसिद्धी मुळे पुन्हा जोमाने काम करण्याची संधी मिळत गेली आणि जनतेची सेवा करण्याचा उत्साह वाढला. यावेळी पुन्हा जर आपण सर्वांनी आशीर्वाद दिले तर त्याकाळात राहिलेले उर्वरित कामे पूर्ण करण्याचा जनसेवेचा वसा नव्याने पुढे चालवण्याचा आपण संकल्प केला असून तो पूर्ण करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.