ही आठवण हृदयात साठवणून ठेवलेली आहे. ठेवणार आहे . डोळ्यात समावलेली आहे. हृदयात सतत हिंदोळे घेणारी ही आठवण .जीवनात कधीच न विसरली जाणारी घटना . या चांगल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर बसून मी आनंदी जीवन जगत आहे. मला वाटायचं कोणी अधिकारीपदावर असताना त्याच्या मागे पुढे रहाणारे चमचे खुप असतात . गरज सरो नि वैद्य मरो म्हणणारे खुप लोक आपण पहातो. पण पदावरून दुर गेल्यानंतर पुन्हा त्याला कोणीही विचारत नाही. पण मी निश्चितच नसिबवान आहे. माझे सहकारी शिक्षक बंधू कंधार व लोहा हे मला विसरलेले नाहीत .व कधीही विसरणार नाहीत .गुरुजी तुमचं मिळालेले प्रेम ,तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या झोळीत तुम्ही दिलेले प्रेम भरून मी ते माझ्या पाठीवर न टाकता माझ्या हृदयात आडकवून ठेवलेली आहे.ती प्रेमाची झोळी कायम भरलेली माझ्याकडेच राहणार आहे.
मलाही वाटायचं मी पदावर आहे म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम असल्याचं नाटक करताय. तुम्हाला मी ओळखण्यात चुक केली असेल .त्यात माझी चूक झाली असेल .तुमच्या प्रेमाला ओळखण्यात मी नापास झालोय .तुम्ही मात्र मला तुमच्या हृदयातून प्रेम देवून विशेष प्राविण्यासह उतीर्ण झालेले आहात . माझे शिक्षक बंधू, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या एवढं प्रेम मला कुठेच मिळालं नाही . आजही मी तुमचा आहे .तुम्ही माझे आहात. प्रेमाची ओहटी कधीच येणार नाही .फक्त येत राहील कायमच प्रेमाची भरती. प्रेम देत रहावे हीच अपेक्षा.
हे प्रेम आटलेलं नाही .आटणारनार ही नाही . प्रेम संपलेलं नाही व संपणारही नाही. तूमचं प्रेम डबक्यात साचलेलं नाही .ते सतत वाहातं आहे. निर्मळ निखळ झऱ्यासारखं. त्यात खळखळाट आहे प्रेमाची. त्यात द्वेष नाही. शांत निर्मळ झऱ्यासारखं प्रेम असचं आसू द्या. नोकरी पोट भरण्यासाठी आहे . प्रेम सहानुभूती जिव्हाळा आपुलकी हे जीवन जगण्यास सामर्थ्य देतात . त्या बळावर आपण सुखी जीवन जगत असतो . कंधार लोहा व नांदेड जिल्हयातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या व नकरणाऱ्यानांही माझा त्रिवार सलाम .मी जीवनात पावसाळा उन्हाळा हिवाळा पाहिलाय !पण कंधार लोहा तालुक्यातील जिव्हाळा वेगळाचं !