डॉ.सुर्यकांत लोणीकर यांच्या आई अनुसयाबाई लोणीकर यांच्या पुण्यानुमोदना कार्यक्रमा निमित्य लोणी येथे १ फेब्रुवारी रोजी बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांच्या आई अनुसयाबाई रामराम लोणीकर (रा.लोणी ता.उदगीर जि. लातूर) यांचे शुक्रवार दि. २० जानेवारी रोजी आकस्मिक निधन झाले. त्यानिमित्त बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी पुण्यानुमोदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी विद्रोही भीमशाहीर कैलासदादा राऊत, विशाखाताई नांदेडकर व सिनेअभिनेत्री कल्याणी कोकरे यांचा रात्री ९.३० वाजता बुद्ध- भीमगीतांचा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुर्यकांत लोणीकर, डॉ. रंजना लोणीकर, स्नेहलता नेत्रगावकर, छाया लोणीकर, निमिशा बडे आदींसह लोणीकर परिवाराने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *