कंधार ; प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या हाथ से हाथ जोडो अभियाना अंतर्गत पानभोसी तालुका कंधार येथे गावातील नागरिकांशी जिल्हा कॉग्रेस कमिटी सरचिटणीस संजय भोसीकर यांनी संवाद साधला .
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश भाऊ भोसीकर, गोविंदराव नाईकवाडे मुकदम,माजी संरपंच बालाजीराव भातमोडे,मन्मथ नाईकवाडे, ग्रामपंचायत सदस्य राजेश्वर गोंड,शिवदास नाईकवाडे, नारायण पाटील लुंगारे,विठ्ठल गिरी महाराज, पुंडलिक भोसीकर,गणेश डोंग,मंगेश पाटील, परमेश्वर भोसीकर त्र्यंबक घोडके,आदींसह कॉग्रेस कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते .