प्रचंड ध्येयवादी आणि ऊर्जा देणारं व्यक्तिमत्त्व कोणतं असेल असा प्रश्न विचारला तर निखिलभाऊ लातूरकर यांचं नाव डोळ्यासमोर येतं. कुणी कुठेही गेलं तरी एक सच्चा शिवसैनिक म्हणून नांदेडकरांच्या मनात त्यांनी आपल्या कार्याने एक वेगळा ठसा उमटवला आहे. अशा मोठ्या मनाच्या परंतु हळव्या व्यक्तिमत्त्वाच्या काळजात साठवलेल्या काही आठवणी. निखिलभाऊ लातूरकर यांचा 10 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करून भाऊंना शब्दरुपी शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार तथा ब्राह्मण महासंघाचे प्रांत सचिव सुनिल रामदासी यांचा हा विशेष लेख…
राजकीय, सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या व्यक्तीची गरज असते. नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना आणि व ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून निखिलभाऊ लातूरकर यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची क्षमता यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत आपली वेगळी ओळख आणि वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कोरोनासारख्या संकटात ते जनतेच्या व विशेषतः ब्राह्मण समाजातील कुटुंबासाठी धावून आले. ब्राह्मण समाजाच्या विकासाच्या नवनव्या संकल्पना ते सतत राबवत असतात. शिवसेना पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन ते त्या शिवसैनिकास उभे करत असतात.
राजकारण हा त्यांचा पिंड नसून गोरगरीब, युवा कार्यकर्त्यांना राजकारणात यशस्वी करण्यासाठी भाऊ नेहमीच प्रयत्नशील असतात. राजकारणात त्यांना कुठल्याही पदाची अपेक्षा नाही तसेच भविष्यात राजकीय महत्त्वाकांक्षा देखील नाही. भगवान परशुराम चौक सुशोभित करून नवीन मंदिराची निर्मिती करण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भेटून हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात आली होती.तेव्हा नांदेड जिल्ह्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड, रेमडिसिवर, प्लाझमाची अत्यंत आवश्यकता भासू लागली. कोरोनाने अक्षरशः हाहाःकार माजवला होता.अशात कुठलीही सरकारी यंत्रणा हाताशी नसताना एक माणूस गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी आणि मदतीसाठी स्वतःची पदरमोड करून आपल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आरोग्य यंत्रणेला मदत करू लागला. अनेक गोरगरीब रुग्णांना त्यांनी मदतीचा हात दिला. अशावेळी निखिलभाऊ कोरोना रुग्णांच्या पाठीशी जणू देवदूत म्हणून उभे राहत होते.
निखिलभाऊ यांच्याकडे नांदेड जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सदस्य, तर नांदेड जिल्हा स्कूल बस व्हॅन असोसिएशन, नांदेड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन, नांदेड जिल्हा सायकल असोसिएशन, लोक स्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन, भारत या महत्त्वाच्या संघटनांचे जिल्हाध्यक्ष पद आहे. ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. तर ब्रह्म महा शिखर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असून ते ह्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. निखिल भाऊ हे शिवसेनेच्या माध्यमातून नांदेड शहरात अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असतात. गेल्या 20 वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा,भगवान परशुराम जन्मोत्सव, हिंदू नवीन वर्षे म्हणून गुढीपाडव्याला भव्य शोभायात्रा, स्कुल बस चालकासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान हे त्यापैकी काही उपक्रम आहेत.
अशा या ध्येयवादी, सच्चा आणि विनम्र विभूतीस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!