लोहा कंधार मतदार संघातील खरीप हंगामातील अतिवृष्टीने बाधित पिक विमा पात्र शेतकऱ्यांना आजपर्यंत पिक विम्याची 25% रक्कम मिळालेली असून उर्वरित रक्कम लोहा कंधार मतदार संघातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार असल्याची माहिती लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्य दक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली,
गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी लोहा येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य योजना सन 2023 चा शुभारंभ लोहा कंधार चे आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला, यावेळी आमदार शिंदे यांनी लोहा कंधार मतदार संघातील अतिवृष्टी च्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ वाढीव पिक विमा अदा करण्यासाठी कृषी विभागाचे सहसंचालक दिवेकर व जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे व प्रमुख कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले असता कृषी विभागाचे सहसंचालक दिवेकर व
जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी आमदार शिंदे यांना बोलताना सांगितले की लोहा कंधार मतदार संघातील पिक विमा पात्र व खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची उर्वरित रक्कम लवकरच विमा कंपनी देणार असून कृषी विभागाच्या वतीने विमा कंपनीला लोहा कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना तात्काळ उर्वरित शिल्लक पिक विम्याची रक्कम अदा करण्याचे निर्देश कृषी विभागाच्या वतीने व जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे सांगून नांदेड जिल्ह्यात लोहा व कंधार तालुक्यातील पिक विमा पात्र शेतकऱ्यांना मतदार संघातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने अतोनात नुकसान झाल्याने जिल्ह्यात लोहा कंधार मतदारसंघातील पात्र शेतकऱ्यांना जास्तीचा वाढीव पिक विमा ची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक दिवेकर व जिल्हा कृषी अध्यक्ष रविशंकर चलवदे यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांना सांगितले ,
त्यामुळे लोहा कंधार मतदार संघातील खरीप हंगामातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची उर्वरित रक्कम लवकरच मिळणार असल्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.