माजी आयुक्त मच्छिंद्रनाथ देवनीकर यांचे निधन

नांदेड ; प्रतिनिधी

माजी मंत्री कै.मधुकरराव घाटे यांचे जेष्ठ जावई तथा मा.आ.अविनाश घाटे व प्रवीणकुमार मधुकरराव घाटे यांचे मोठे भावजी माजी उपजिल्हाधिकारी देगलूर ते माजी आयुक्त कै.मच्छिंद्रनाथ देवनीकर यांचे आज रात्री हृदय विकाराच्या तीव्र झटक्याणे जूपिटर हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले .

त्यांचा अंत्यविधी बालेवाडी बाणेर पुणे येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी सोमवारी ठीक 5.00 वजाता होणार आहे .

कै. देवनिकर साहेब यांनी त्यांचे कारकिर्दीत उपजिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, पुणे महापालिका उपआयुक्त व कृषी आयुक्त (Horticulture) महाराष्ट्र राज्य पुणे आश्या विवीध पदावर सनदी अधिकारी म्हणून कार्य केले . मृत्यू ते वय 67 वर्षाचे होते . त्यांचा पाश्यात पत्नी,तीन मुले आणि सून असा मोठा परिवार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *