आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कुस्ती पैलवान मारुती कोचार यांचा सत्कार

प्रतिनिधी

लोहा तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथील प्रसिद्ध कुस्तीपटू पैलवान मारुती नारायण कोचार यांना बसवनखडूची बेळगाव कर्नाटक येथे संपन्न झालेल्या श्री माऊली क्षमाभिवृद्धी कुस्ती केसरी स्पर्धेत विजेतेपद पटकावून मानाचा चांदीचा गदा पटकाविल्याबद्दल लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी कुस्तीपटू विजेता मारुती कोचार यांचा भव्य सत्कार व अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, लोहा कंधार मतदारसंघातील नवोदित कुस्तीपटू व विविध खेळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मतदारसंघातील खेळाडूंना विशेष आर्थिक मदत म्हणून खेळाडूंसाठी विशेष निधींचे पॅकेज उपलब्ध करून खेळाडूंना प्रोत्साहन देणार असल्याचे यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले,

यावेळी धनाजी मामा ढगे, कंधार तालुका शेकाप अध्यक्ष अवधूत पेटकर ,ढगे पिंपळगाव चे सरपंच इंगळे ,बोरीचे सरपंच रामकिशनराव सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *