आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या तिन लक्ष रूपयांच्या निधीतून फुलवळ येथील वार्ड क्रमांक चारचा पाण्याचा प्रश्न सुटला ; माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या तिन लक्ष रुपये निधीमुळे पाण्याचा प्रश्न सुटला असून माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.फुलवळ येथे वार्ड क्रमांक चार मध्ये दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी बोर गाडीची विधीवत पूजा व भूमिपूजन करण्यात आले . बोअरला पाणी भरपूर प्रमाणात लागले असून पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला अशी माहिती माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे यांनी दिली .

 

 

यावेळी उपस्थित मान्यवर सरपंच प्रतिनिधी नागनाथ विठ्ठलराव मंगनाळे यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आले व पांडुरंगाच्या कृपेने लगेच त्याच ठिकाणी पाणीसुद्धा खडका तुन पाणी वर आले . दिनांक १३ फेब्रुवारी रोजी त्यात मोटर बसविण्यात आली आणि श्री शंभू महादेव श्री शेत्र महादेव मंदिर फुलवळ मठाधिपती दत्ता महाराज यांच्या हस्ते मोटर चालू करण्यात आली , पाणी लगेच चालू करण्यात आलं . दोन ते चार दिवसांमध्ये छोट्या पाण्याच्या टाक्या दोन बसविण्यात येणार असून एक कैकाडी वस्तीमध्ये आणि एक दलित वस्तीमध्ये पाईपलाईन जोडून कलेक्शन देण्यात येणार आहे व मुस्लिम वस्तीला सुद्धा नळाचे कलेक्शन देण्यात येणार आहे अशी माहिती माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी दिली .

 

 

यावेळी प्रमुख उपस्थित सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे ग्रामपंचायत सदस्य फुलवळ व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सोमासे , तसेच सामाजिक कार्यकर्ते नागेश गोधने , जयराम मामा जाधव , एकनाथ गोधने , मधुकर जाधव हुसेन , निश्चलकर शंकर मामा सोळंके , मनोहर जाधव , सूर्यकांत जिलेवाड व इतर गावातील पत्रकार मधुकर डांगे आणि त्यांचे सहकारी नांदेडचे पत्रकार आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

 

पुढे बोलताना माजी सरपंच बालाजी देवकांबळे म्हणाले की आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेका पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांच्या सहकार्यातून तीन लक्ष रुपये फुलवळ येथे वार्ड क्रमांक चार मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असल्यामुळे आपल्या इथले सामाजिक कार्यकर्ते नागेश गोधने , शिवाजी सोमासे , माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या सहकार्यातून आमदार साहेबांना विनंती करण्यात आली त्या विनंतीला मान दिला आणि लवकरात लवकर तीन लक्ष रुपये निधी फुलवळ साठी उपलब्ध करून देण्यात आले .

 

 

 

आमदार श्यामसुंद शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाताई शामसुंदर शिंदे या दोघांचेही फुलवळ नगरीमध्ये अभिनंदन करण्यात आले व असेच त्यांचे फुलवळ सर्कलवर त्यांची अशीच नजर राहावे व जास्तीत जास्त निधी उपलब्ध द्यावा अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *