कंधार ; तालुक्यातील 10 वी च्या 15 केंद्र संचालक व 12 वी च्या 14 केंद्र संचालकांची बैठक गट साधन केंद्र पंचायत समिती कंधार येथे आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी अनुपसिंह यादव परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार कंधार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . काॅपी मुक्तीसाठी बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर तैनात करण्यात येणार आहे अशी माहिती अनुपसिंह यादव यांनी दिली .
कंधार तालुक्यातील 10 वी 12 वी च्या सर्वच केंद्र संचालकांची बैठक गट साधन केंद्र पंचायत समिती कंधार येथे पार पडली. तहसीलदार यांनी उपस्थित सर्वांना काॅपी मुक्त वातावरणात परीक्षा करण्याबाबत कडक सुचना दिल्या सदरील बैठकीसाठी कंधार तालुक्यातील गटविकास अधिकारी प्रतिनिधी , गटशिक्षणाधिकारी अधिकारी मधुकर मोरे . शिक्षा विस्तार अधिकारी संजय येरमे , विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती .
परीक्षा काॅपी मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी कंधार तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक असेल सदरील बैठे पथकात एक तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, शिक्षण विभागाचा एक कर्मचारी असेल. तसेच तालुक्यात दोन भरारी पथक असतील अशी माहिती मा. तहसीलदार अनुपसिंह यादव यांनी दिली .
सदरील 12 वी ची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरु होत आहेत.