गऊळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी 

गऊळ ;शंकर तेलंग

गऊळ तालुका कंधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी केली.
देश सेवा बजावणारे आर्मी सुनील गिरे, तुकाराम देवकांबळे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष मंगेश गिरे, उपाध्यक्ष शंकर तेलंग यांनी पूजन केले. शिवप्रतिष्ठान कमिटीच्या सर्व सदस्याच्या वतीने शिव ध्वजारोहण करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी लेझीम पथक सादरीकरण केले डान्स, भाषण, गावातील प्रभात फेरी, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आकाश केंद्रे विविध कार्यक्रम करण्यात आले केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर तेलंग गुरुजी तानाजी गिरे, भगवान गिरे, लक्ष्मण तेलंग , बंटी तेलंग भास्कर तेलंग मंगेश गिरे, प्रशांत ताटे तुकाराम श्रीमंगले, संदीप पंदेवाड ,पांडुरंग गुट्टे ,बालाजी तेलंग ,ऋत्विक जाधव ,भागवत तेलंग.

तसेच या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कार्यालय सरपंच व सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, व्यापारी, आणि छत्रपती चे नवतरुण मावळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *