आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करून अभिवादन ;जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दणाणला

लोहा प्रतिनिधी

लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते लोहा शहरातील जुना लोहा येथील रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले, यावेळी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली, जुन्या लोह्यातून छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्यानंतर शहरातील छ. शिवाजी महाराज चौकातील चौकापर्यंत भव्य सायकल रॅली काढून आमदार श्यामसुंदर शिंदे आशाताई शिंदे यांच्या हस्ते शिवाजी महाराज चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भव्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,

यावेळी शिवजयंती निमित्त अत्यंत उत्साहात व आनंदात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने सर्व परिसर दुमदुमला होता, लोहा येथील विविध कार्यक्रमाच्या नंतर लोहा कंधार चे आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे यांनी माळाकोळी येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला भव्य पुष्पहार घालून अभिवादन केले, यावेळी आमदार शिंदे , व आशाताई यांनी शिवछत्रपती महाराज यांच्या अलौकिक शोर्याची भाषणातून शिवप्रेमींना माहिती दिली व सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी मा. जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, उपसभापती शाम अण्णा पवार, सरपंच पुंडलिक पाटील बोरगावकर ,जिल्हाधक्ष अवधूत पाटील शिंदे, शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर ,माळाकोळी चे सरपंच मोहन काका शूर, मनोज भालेराव ,तालुकाध्यक्ष नागेश खांबेगावकर, अवधूत पेठकर, सुधाकर सातपुते, सरपंच शंकर माने, सिद्धू वडजे, प्रसाद जाधव, राहुल पाटील, अशोक बोधगिरे, वसंत मंगनाळे,सचिन कल्याणकर,अशोक सोनकांबळे सह पदाधिकारी ,कार्यकर्ते शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

*आ. शिंदे यांचा नगराध्यक्ष सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार*

लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा काल शिवजयंती निमित्त लोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्या आग्रहास्तव लोहा नगरपरिषदे परिषद कार्यालयाला भेट दिली असता नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार केला व शहरातील विविध विकास कामावर सखोल चर्चा केली, यावेळी नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी आमदार शिंदे व सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, श्याम अण्णा पवार, जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे,बालाजी इसादकर, नगरसेवक संभाजी चव्हाण, नगरसेवक जीवन चव्हाण ,अमोल व्यवहारे, केतन खिल्लारे सह नगर परिषदेचे नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *