कंधार ; प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र कंधारच्या वतीने त्रिमूर्ती महाशिवरात्री महोत्सवानिमित्त 22 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता सर्व धर्मीय संमेलन कार्यक्रमाचे आयोजन बालाजी मंदीर, भवानी नगर कंधार येथे करण्यात येत आहे. ईश्वराचे सत्य स्वरूप या विषयावर महानुभावांचे अनमोल विचार ऐकण्यासाठी कार्यक्रमात सम्मिलित होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे आव्हान ब्रह्माकुमारीज कंधारच्या संचालिका ज्योती बहेणजी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण हे शिवशंकर झाकी, लघु नाटिका आणि भव्य शिवलिंग दर्शन आहे. या सर्वांचे लाभ घेण्यासाठी आपण सर्वजण सादर आमंत्रित आहात. असे आवाहन
ईश्वरीय सेवेत ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी कंधार यांनी केले .