कंधार ; प्रतिनिधी
आज दि २१ फेब्रुवारी पासून १२ वी च्या परीक्षा सुरळीतपणे चालू झाल्या आहेत . परीक्षेच्या पहील्याच दिवशी परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , मुख्यकार्यकारी अधिकारी ठाकुर यांनी दिल्या पहिल्याच दिवशी भेटी दिल्या .
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलीक , मा. अनुपसिंह यादव परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार कंधार, नायब तहसीलदार नयना कुलकर्णी मॅडम, नायब तहसीलदार संतोष कामठेकर कंधार यांनी तालुक्यातील 12 वी परीक्षा असलेल्या विविध परीक्षा भेटी दिल्या.
तसेच कंधार तालुक्यातील 14 परीक्षा केंद्रावर मा. अनुपसिंह यादव परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच परीक्षा केंद्रावर बैठे पथक कार्यरत केले होते.
तसेच मा. जिल्हाधिकारी नांदेड व मा. उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलीक साहेब यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस मा. व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी व शिवाजी हायस्कूल कंधार या ठिकाणी भेटी दिल्या व तसेच तहसील मा. अनुपसिंह यादव परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार कंधार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस मा. व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी, शिवाजी हायस्कूल पानभोसी रोड कंधार, महात्मा फुले विद्यालय शेकापूर, मा. विद्यालय गांधीनगर, मा. वि. पेठवडज, मा. विद्यालय गोणार अशा 6 ठिकाणी भेटी दिल्या.व बैठे पथक व केंद्र संचालक यांना काॅपी मुक्तीबाबत सुचना दिल्या. तसेच गटविकास अधिकारी कंधार व गटशिक्षणाधिकारी कंधार यांनी सुध्दा मा तहसीलदार यांच्या आदेशानुसार भेटी दिल्या. कंधार यांच्या पथकात केंद्रे तलाठी, मन्मथ थोटे समन्वयक, ड्रायव्हर शेख इस्माईल होते.
कंधार तालुक्यात १२ वीच्या परीक्षा सुरळीत असून तालुक्यात एकूण १४ परीक्षा केंद्र आहेत. यात श्री शिवाजी कॉलेज, नवरंगपुरा २०० विद्यार्थी, श्री शिवाजी हायस्कूल, कंधार ३३२,
श्री शिवाजी विद्यालय, कुरुळा २७४, पोस्ट बेसिक उच्च माध्यमिक शाळा, गांधीनगर ३४८, श्री शिवाजी विद्यालय, बारूळ २८८, नेताजी सुभाषचंद्र बोस माध्य व उच्च माध्य शाळा, पानभोसी ७४८, गोविंदराव पाटील विद्यालय, चिखली ४११, भीमाशंकर विद्यालय, शिराढोण ४२८, महात्मा फुले विद्यालय, शेकापूर ५१५, संत नामदेव महाराज ज्युनिअर कॉलेज, पेठवडज ५८७, मनोविकास माध्यमिक विद्यालय, कंधार १११, शांतीदूत गोविंदराव पाटील माध्यमिक विद्यालय, गोणार ३८३, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, बाचोटी २६४, माणिकप्रभु विद्यालय, आंबुलगा ३१९ असे ५ हजार २०७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.