नांदेड, (प्रतिनिधी)- राज्यातील सर्वच शहरातील नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. या वाढलेल्या भागात अनेक नागरी समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भागाचा आमदार असतांना व त्यानंतर सुद्धा तरोड्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला. भविष्यात सुद्धा हीच भुमीका आपली असुन शहरांचा विकास ही निरंतर प्रक्रिया असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. तरोडा भागातील लक्ष्मीनारायण येथे अंतर्गत रस्त्याचा लोकार्पण सोहळा व भजनसंध्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्या पुढाकारातून महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या भजनसंध्या व रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजुरकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मिनलताई खतगावकर, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, स्थायी समीतीचे माजी सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, मजुर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे, तालूकाध्यक्ष शरद पवार, मनोहर शिंदे, सी.ए. मनोहर आयलाने, माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, आनंदराव चव्हाण, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष मंगेश कदम, बाबुराव देशमुख कौठेकर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विजय देवडे, शहरउपाध्यक्ष संतोष मुळे, धम्मा कदम, सखाराम तुप्पेकर, अवधुत क्षिरसागर, अविनाश रावळकर, अशोक कदम, नागोराव पाटील मोरे, किशन पाटील लोंढे, उत्तम पाटील वडवळे, राम सोनसळे, दिपक पावडे, माजी सरपंच साधना देशमुख तरोडेकर, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण पुढे म्हणाले की, तरोड्याचे व माझे जुने नाते आहे. या भागाचा आमदार म्हणून मी दहा वर्षे काम केले आहे. या भागाच्या विकासासाठी मी व माझ्यानंतर माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी भरीव निधी उपलब्ध करुन दिला. यावेळी बोलतांना संयोजक संतोष पांडागळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी भूमीका विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत डोके यांनी केले. सूत्रसंचलन साईनाथ पांडागळे यांनी केले. तत्पूर्वी पाहुण्यांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य बाबुराव पांडागळे, शासकीय ठेकेदार बालाजी पांडागळे, गोविंद पांडागळे, ॲड. अरुण मोरे, संतोष सुर्यवंशी, श्रीनिवास बंकलवाड, अदित्य बकवाड यांच्यासह संयोजन समितीतील सदस्यांनी केले. या कार्यक्रमास तरोडा व परिसरातील नागरिक मोठ्यां संख्येने उपस्थित होते. गायक उकेश शिखवाल व संजय शर्मा यांच्या भजनाचा उपस्थितांनी आनंद घेतला.