कंधार ; प्रतिनिधी
कंधार ग्रामीण रुग्णालयात ताण-तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर श्री.गुरूगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रूग्णालय, नांदेड च्या वतीने मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर ग्रामीण रुग्णालय कंधार, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा “मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रम”श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय,नांदेड
जिल्हा मानसिक आरोग्य सेवा प्रेरणा प्रकल्प अंतर्गत आज मंगळवार दि.२१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक १०:१५ वा सुरुवात झाली,नांदेड येथून आलेले डॉ.मानसोपचार तज्ञ डॉ.शाहू शिराढोणकर यांचा सत्कार डॉ.महेश पोकले यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले व तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण वाघमारे यांचा सत्कार डॉ.संतोष पदमवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले आणि समुपदेशन परिचारिका रुपाली मस्के मॅडम यांचा सत्कार आऊबाई भुरके यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय कंधार येथे ताण-तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिरात १०८ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये आजार निघालेले मधुमेह-०४,रक्तदाब-०८,मधुमेह आणि रक्तदाब -०२,थायरॉईड-०२,मनोविकार-२५,प्रेरणा-०५ इतर आजाराचे रुग्ण-६२ असे एकूण-१०८ रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
कंधार ग्रामीण रुग्णालयातील उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले,डॉ.दत्तात्रय गुडमेवार ,डॉ.संतोष पदमवार,अरविंद वाठोरे,अधिपरिचारिका श्रीमती.आऊबाई भुरके,निमिषा कांबळे ,अशोक दुरपडे, याप्रसंगी उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यापुढे ज्या ज्या लोकांना ताण-तणाव मनोविकार सदरील आजारी असणाऱ्या रुग्णांनी आपली नोंदणी नियमित ग्रामीण रुग्णालय कंधार येथे करून घ्यावे असे शिबीर नियमित होणार आहेत असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी केले आहेत.