नांदेड: येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिडको गुंडेगाव रोड नांदेड या शाळेत पहिल्या सत्रात वार्षिक स्नेहसंमेलनाचे तर दुसऱ्या सत्रात शाळेत घेतलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरणाचे भव्य आयोजन करण्यात आले होते सदर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीकृत असलेल्या विविध कलागुणातून एकापेक्षा एक सरस व बहारदार नृत्य, ड्रामा, सादरीकरण करून प्रेक्षक व उपस्थित पालकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री डॉ. सुनील लहाने,( आयुक्त म.न.पा.नांदेड.) यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री राजेंद्र हुरणे (अध्यक्ष विश्वनाथप्पा हुरने ज्युनिअर कॉलेज नांदेड) मा. श्री विनय गिरडे (माजी महापौर म.न.पा.नांदेड ) , श्रीमती वंदनाताई मोरगे ,(डायरेक्टर शारदा कन्स्ट्रक्शन नांदेड) , अँड.सौ. दीपा बियानी , डॉ.सौ. विद्या पाटील श्री घोगरे साहेब, संस्थेच्या अध्यक्षा वैशाली मारकोळे पाटील , संस्थेचे सचिव अविनाश मारकोळे पाटील , उपाध्यक्ष डॉ. स्वप्निल बनसोडे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त श्री डॉक्टर सुनील लहाने साहेब म्हणाले की शैक्षणिक गुणवत्तेसह विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अविरत अग्रेसर असणाऱ्या ग्लोबल सारख्या शाळेत तुमचा मुलगा शिकतो म्हणजे त्याच्या भवितव्याबाबत निश्चित रहा व आपल्या पाल्याची इतर पाल्यासोबत तुलना करू नका तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असेल तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मेघा स्वामी यांनी केले. या नेत्र दीपक सांस्कृतिक कार्यक्रमाने सिडको हडको वाशीय मंत्रमुग्ध झाले असून कार्यक्रमास पालक व प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांचे जबरदस्त नृत्य पाहून प्रेक्षक भारावून जात होते व चिमुकल्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक करत होते श्री गणेशाय धीमही , पुलवामा अटॅक, सेव गर्ल थीम , अशा अनेक गाण्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ खेडवणकर तर आभार संस्थेचे सचिव अविनाश मारकोळे पाटील यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री गणेश स्वामी, मुख्याध्यापिका मेघा स्वामी, प्रा. नितीन गंदीगुडे, भाग्यश्री बारसे, अश्विनी कवडे, ज्योती राठोड, सीमा कोयलवार,नीता उशलवर, पावडे पी.एस. ,रूपाली भोसले, भाग्यश्री चौधरी, ज्योती कोकरे, उज्वला कदम, सोनी डुबुकवाड, साईनाथ खेडवनकर, शिवलिंग तुरेराव, वर्षा गवळी आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.