कंधार/प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौजे कळका येथील रहिवासी गणपतराव रामजी गाडेकर वय १०३ वर्षं यांचे दि.२४ रोजी शुक्रवारी सायंकाळी ७.३५ वा निधन झाले.
त्यांच्यावर २५ रोजी कळका येथे २:५० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी माजी समाजकल्याण सभापती गायकवाड,प्राचार्य माधव गादेकर,दलितमित्र माजी मु.अ.पी.डी.वाघमारे, ग्रामीण रुग्णालय पुर्णा येथील वैद्यकीय अधिकारी,सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक,मित्रमंडळी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली नातू पणतू असा मोठा परिवार आहे.पुर्णा येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ.हरिष गाडेकर यांचे वडिल व कळका येथील सरपंच सौ.सुनंदा गाडेकर यांचे सासरे होत.