धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील रासेयो विभाग आणि सांस्कृतिक विभागातर्फे स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभाग्रहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा गुरमे बी आर होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा मुंडे जी आर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा भगवान आमलापुरे यांची उपस्थिती होती. अभिवादन कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ कोकणे जे पी आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ देशमुख पी डी यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवन आणि कार्यावर यथोचित प्रकाश टाकला आणि त्यांचे विचार आजही कसे सर्व मानवाला उपयोगी पडतात हे सांगितले.प्रा डॉ मामडगे पी डी यांनी प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन केले तर प्रा डॉ सौ मुंडे एस डी यांनी आभार मानले.