नांदेड ; प्रतिनिधी
महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ तर्फे
पहिला ‘स्वरभाव पुरस्कार’ मेवाती परंपरेतील युवा
गायक साईप्रसाद पांचाळ (नांदेड ) यांना गुरुवार, दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यातील ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग येथे प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ समीक्षक मा. कृ. पारधी यांच्या हस्ते पांचाळ यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. संगीत क्षेत्रात मौलिक संशोधन करणाऱ्या अभ्यासकाला किंवा भावपक्षाच्या चिंतनातून आविष्कार करणाऱ्या युवा कलाकारास हा पुरस्कार देण्याची संकल्पना ज्येष्ठ समीक्षक पारधी यांनी मांडली होती.
त्यानुसार पहिल्या वर्षीच्या पुरस्कारासाठी पांचाळ यांची निवड करण्यात आली . पुरस्काराचे स्वरूप , मानपत्र आणि ५०००० रुपयांचा धनादेश असे आहे. या वेळी पारधी यांनी मनोगत व्यक्त केले.
मालकंस रागाचे भावात्मक वर्णन करणारी त्यांची कविता सुभाष इनामदार यांनी सादर केली. पुरस्कार प्रदान समारंभाचे प्रास्ताविक संगीत रचनाकार डॉ. चैतन्य कुंटे यांनी केले. संस्थेतर्फे राजेश देशमुख यांनी आभार व्यक्त केले. ज्योत्स्ना भोळे सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला रसिक आणि संगीत विद्यार्थी उपस्थित होते.युवा
गायक साईप्रसाद पांचाळ यांना मिळालेल्या पुरस्कारा बददल सर्वच स्तरातून कौतूक व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .