कंधार ; एकनाथ तिडके
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साजरी करत आहोत आज विज्ञान दिवसही आहे विज्ञानामुळे प्रगती झाली आहे मात्र यातुन निर्माण होणाऱ्या विघातक बाबींना टाळुन चांगल्या बाबींचा स्विकार करा, भले कोणी डाॅक्टर, इंजीनियर होणार नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीनुसार आपण समाजात एक चांगले व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्या तथा भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा डाॅ जयमंगला औरादकर यांनी केले त्या रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती व बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर समाजसेवक तथा व्यावसायिक शिवा मामडे, भाजपाचे शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, मुख्याध्यापक एस. जी. मुंडे, सहशिक्षक श्री सुर्यवंशी आर. एच. श्री हनुमंते व्ही डी, श्री तिडके ई. पी., श्री होंडाळे आर. आर, श्रीमती शेख वाय. आय, श्रीमती मंजुषा यन्नावार आदी
उपस्थित होते.
यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जिजाऊ चा त्याग राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य, अहिल्याबाई होळकर यांचा राज्यकारभार छत्रपती शिवाजी महाराज यांचा न्याय , समता या तत्वांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला, तसेच रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ईयत्ता सहाव्या वर्गातील विद्यार्थीनी अक्षरा टेंभुर्णेवार हिने केले.