कंधार ; तालुका प्रतिनिधी
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कुरुळा येथे दि .२५ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . इतिहास संशोधक व्याख्याते डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी बोलतांना व्याख्याते श्रीमंत कोकाटे म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराज यांनी राशीभविष्य पाहून स्वराज्य निर्माण केले नसून निष्ठावंत मावळ्यांना सोबत घेवून स्वतःच्या कृतृत्वावर निर्माण केले असून यामुळे अंधश्रद्धा व जातीभेद यांना मुठमाती देवून शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले .
या कार्यक्रमास उदघाटक म्हणून परीविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार अनुपसिंग यादव उपस्थित होते.तसेच दि.२६ रोजी गावातून छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या तैलचित्राचे मिरवणूक शिवपार्वती मंदीर पासून काढण्यात आली.यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर ,माजी जिल्हा परीषद सदस्य बाबु गिरे ,सौ.प्रणिता देवरे चिखलीकर ,शिवकुमार भोसीकर ,चिञरेखा गोरे आदीची उपस्थिती होती .
यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
संयोजन समितीचे अध्यक्ष
बाजीराव धुळगंडे, सचिव बालाजी बिंदगे, मुख्य सल्लागार माणिक ढवळे , नारायण मरशिवणे ,कोषाध्यक्ष यादवराव चिवडे, माणिक ढवळे, परमेश्वर जाधव, मरशिवणे, सुभाष मरशिवणे, भगवान चिवडे,राजीव धुळगंडे, दता देवपूजे, बसवेश्वर मठपती,पंडितराव भटलाडे, ज्ञानेश्वर श्रीमंगले, गंगाधर टोकलवाड, माधव किरपणे,भानुदास टॉपे, आंतेश पांढरे, आकाश नाईक, सचिन पांढरे, नामदेव मुसांडे, जनार्धन नाईक, कैलास मरशिवणे, मनोहर गोमारे, निलेश मरशिवणे, संतोष मरशिवणे, रामचंद्र किरपणे, पुंडलिक नाईक, बजरंग चिवडे , तक्षक ढवळे ,पवन ढवळे,गंगाधर टोकलवाड ,नामदेव कुट्टे, राम अनकाडे तुकाराम जाधव, संग्राम गुंडाळे , बालाजी केंद्रे ,संभाजी सोनकांबळे, विठ्ठल तिकटे, बालाजी थोटे, विनायक कुलकर्णी, बाबुराव थोटे, मारोती ढवळे, गणेश किरपणे, विठ्ठल ढवळे, पत्रकार विठ्ठल चिवडे, गोविंद नाईक, हरि श्रीरामे, बबन नाईक, महेपती नाईक आदींसह गावकरी, महिला, पुरुष यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माणिक ढवळे यांनी तर आभार राम पाटील अनकाडे यांनी केले .