शंकरअण्णा धोंडगे यांची राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी ; राष्ट्रवादी किसान सभेच्या राज्यप्रमुख पदाचा राजीनामा

 

कंधार ; प्रतिनिधी

 

लोहा-कंधार मतदार संघाचे माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी किसान सभेच्या राज्यप्रमुख पदाचा राजीनामा जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,महाराष्ट्र राज्य यांना दिला आहे .

सदरील लेटरहेड माध्यमात व्हायरल झाले आहे . राजीनाम्यात असे नमूद केले की
मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे आपल्या पक्षाच्या राष्ट्रवादी किसान सभेच्या राज्यप्रमुख पदावरून कार्य मुक्त होत आहे.

आपल्या आत्तापर्यंतच्या सहकार्या बद्दल धन्यवाद !!!

आपला

शंकरअण्णा धोंडगे

माजी आमदार (लोहा-कंधार)

तसेच शिवराज धोंडगे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .

शंकर अण्णा धोंडगे हे तेलंगणाचे आमदार केसीआर यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा होती .

 

 

आज कंधार तालुक्यातील बाळांतवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक याबाबत बोलावली होती . त्यात हा राजीनामा दिला आहे .

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *