गुढीपाडवा व राम जन्मोत्सवानिमित्त २३ मार्च रोजी कंधार मध्ये महाआरतीचे आयोजन

कंधार ; (अंतेश्वर कागणे )

हिंदू नववर्ष गुढीपाडवा व राम जन्मोत्सवानिमित्त कंधार  शहरातील श्री मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि २३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता महाआरती, भजनसंध्या व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे राम जन्मोत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

        कंधार तालुक्यात श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त शहरातील सर्व घरांवर मंदिरांवर भगवे ध्वज लावले जातात त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हिंदू नववर्ष गुढीपाडवा व स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री मारुती मंदिर प्रांगण येथे दि २३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता महाआरती भजन संध्या व महाप्रसाद यांचे आयोजन केले आहे या महाआरती भजन संधेस श्री गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती ,श्री संत नामदेव महाराज संस्थान श्रीक्षेत्र उमरज, डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, गणाचार्य मठ संस्थान मुखेड श्री १०८ गुरू गयबी नागेंद्र महाराज ,मठ संस्थान पानभोसी ,ह भ प एकनाथ महाराज साधू, मठाधिपती साधू महाराज संस्थान कंधार ,श्री गुरु दत्त गिरी आनंद गिरी महाराज ,दत्त महाराज संस्थान बोरगाव गुरुवर्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या  आरती भजन संध्या व महाप्रसादास सर्व कंधार वासीयांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्रीराम जन्मोत्सव समितीचे अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *