कंधार येथिल शिक्षकाची ऑनलाईन फसवणुक :8,88,398 – रूपये काढुन घेतले

कंधार :- दिनांक 21.03.2023 चे 13.00 ते 16.00 वा. चे दरम्यान, मनोविकास विद्यालय कंधार ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीस अज्ञात आरोपीने मोबाईल वरून फिर्यादीचे मोबाईलवर कॉल करून हे एसबीआय बँकेचा हेल्पलाईन नुबर असल्याचे सांगुन फिर्यादीस एसबीआय बँकेचे युनो अॅपवर फिर्यादीचा प्रोफाईल बँक डिटेल्स भरण्यास सांगुन त्यात दहा रूपये चार्ज भरण्यास सांगीतले व त्यानंतर फिर्यादीचे बँक खाते मधुन आरोपीने टप्याटप्याने 8,88,398 /- रूपये काढुन घेवुन फिर्यादीची ऑनलाईन फसवणुक केली आहे. वगैरे फिर्यादी विरभद्र पि. व्यवसाय बुलेरे, वय 47 वर्षे, व्यवसाय नौकरी शिक्षक कंधार रा. श्रीनगर मुखेड ता. मुखेड जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कंधार गुरन 77 / 2023 कलम 420, भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि / श्री लोणीकर, मो.नं. 9422366474 हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *