गऊळ येथे क्रिकेट च्या खुल्या सामन्यांचे आयोजन..

 

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ पासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील मौजे गऊळ येथे गुढीपाडव्याच्या अनुषंगाने व राम नवमीचे औचित्य साधून टेनिस बॉल वरील क्रिकेट च्या खुल्या सामन्यांचे ता.२५ मार्च पासून आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा परिसरातील तसेच सर्व क्रिकेट प्रेमींनी याची नोंद घेऊन आपापल्या संघाची नावनोंदणी करून घेऊन जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक योगीराज व लोकडेश्वर क्रिकेट क्लब गऊळ च्या वतीने करण्यात आले आहे.

ता.२५ मार्च रोज शनिवारी सकाळी ११ वाजता या क्रिकेट सामन्यांची सुरुवात होणार असून उदघाटक म्हणून प्रवीण पाटील चिखलीकर , बाबुराव पाटील गिरे , संजीवकुमार पाटील तेलंग यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर सामन्यात सहभागी होण्यासाठी ता. २४ मार्च पर्यंत एन्ट्री फी भरुन नावनोंदणी करायची असून एंट्री फी ७०१ /- रुपये प्रति संघासाठी असणार आहे.

सदर सामन्यातील विजेत्या संघासाठी प्रथम पारितोषिक २११२१/- रुपये असून हे कै. संभाजी पाटील गिरे यांच्या स्मरणार्थ असणार आहे. द्वितीय पारितोषिक १११११/- रु असून योगीराज हेअर कटिंग सलून च्या वतीने देण्यात येणार आहे. तर तृतीय पारितोषिक ७७७७/- रु असून हे कै. केशवराव पाटील तेलंग यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी १५०१/- रु , बेस्ट कॅच साठी १००१/- रु , बेस्ट विकेट हट्रिक साठी १००१/- रु , हट्रिक सिक्स साठी १००१/- रु , बेस्ट बॉलर साठी १००१/- रु , बेस्ट विकेट किपर साठी १००१/- रु असे प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *