पेठवडज येथील मध्यम प्रकल्पा अंतर्गत सिंचन तलावातील पाणी बाहेरील तालुक्यातील गावास न देण्यास ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर.

 

पेठवडज( कैलास शेटवाड)

 

पेठवडज ता.कंधार येथील गावातील मध्यम प्रकल्पाअंतर्गत धरणातील/तलावातील पाणी केंद्र सरकारच्या जल जिवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल या व ई.योजनेतून बाहेरील तालुक्यातील गावास पेठवडज धरणातील पाणी विहीर खोदकाम करून पाणी देण्यात येवू नये असा ठराव ग्रामसभेत बहुमताने पारित केला आहे. त्रिपाठी निर्णय दि.06/01/2023 रोजीचे परिपत्रकानुसार.म.शा.पा.पु.व स्वच्छता विभाग मंञालय मुंबई यांनी पाणी पुरवठा करण्याकरिता अंमलबजावणी यंत्रणेने शासकीय विभाग/स्थानिक स्वराज्य संस्थां यांच्या अधिपत्याखालील जागा उपलब्ध करून देण्यासाठी आदेशित केले आहे.पेठवडज गावातील ग्रामस्थ व शेतकरीवर्ग यांनी दि.03/04/2023 रोजी ग्रामपंचायत पेठवडजला निवेदन देवून गावकरी यांचे सोबत ऊभे राहून ग्रा.पं.पेठवडजने पुढाकार घेवुन ग्रामसभेत ठराव घेवून शासनास/व संबधित अधिकारी वरिष्ठांना पाठपुरावा करावा असे म्हटले आहे.तरि सदरील दि.04/04/2023 या रोजी च्या विशेष ग्रामसभेचे अध्यक्ष सौ.अनिता दत्ता गायकवाड(सरपंच ग्रामपंचायत पेठवडज),ग्रामसेवक श्री.शिंदे साहेब,यांनी शेतकरीवर्ग व नागरिकांच्या निवेदना नुसार दवंडी देवून विशेष ग्रामसभेचे आयोजन केले असून कोरम/गणपुती पुर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे सौ.आनिता दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेस सुरूवात झाली.तरि सदरील ग्रामसभेत सुरांनी सुचविल्या प्रमाने मध्यम प्रकल्प पेठवडज ता.कंधार येथील तलावात पाणीसाठा अपुरा असून हा प्रकल्प गाळाने भरलेला आहे हा तलाव पेठवडज परिसरातील सिंचनासाठी व पिण्याचे पाण्यासाठी आहे.भविष्यात पेठवडज व पेठवडज परिसरातील नागरिक व शेतकरी यांना पाण्याची कमकरता पडून वाळवंट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे बाहेरील मुखेड तालुक्यातील गावास पांडुर्णी,कापूरवाडी,आडमाळवाडी ई.व ईतर गावे मुखेड तालुक्यात येत असुन पेठवडज तलाव कंधार तालुक्यात येतो त्यामुळे ग्रामपंचायत व नागरिक व शेतकरी यांनी ग्रामसभा घेवुन ग्रामसभेत असा ठराव घेतला की,तालुक्यांमधील व तालुक्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील गावांना पाणी पुरवठा करण्यात /देण्यात येवू नये ग्रामसभा गावाच्या ग्रामस्थांच्या,शेतकर्‍यांच्या प्रश्नाशी संबधित असल्याने तलावातील खोदत असलेल्या विहिरीचे खोदकाम तात्काळ थांबविण्यात यावे,अन्यथा तीव्र आंदोलन धरणे/ऊपोषण करण्यात येईल असा ठराव अनुमोदकाच्या अनुमोदनाने व सर्वानुमते बहुमताने पारित करण्यात आला.या ग्रामसभेस अध्यक्ष सौ.आनिता दत्ता गायकवाड (सरपंच ग्रा.पं.पेठवडज),श्री.भालचंद्र बापूसाहेब नाईक (शिवसेना ऊपजिल्हा प्रमुख नांदेड तथा माजी. पंचायत समिती सदस्य पेठवडज,ग्रा.पं.सदस्य) श्री.श्याम महाराज जोशी,श्री.राऊत राजे,पांडुरंग व्यंकटराव कंधारे(माजी.चेअरमन से.स.सो.सं.पेठवडज),श्री.संभाजी व्यंकटराव डावकोरे,(ग्रा.पं.पेठवडज सदस्य.प्रतिनिधी),श्री.खुशाल राजे(ग्रा.पं.उपसरपंच प्रतिनिधि),जलसंपदा विभागातील पेठवडज येथील कर्मचारी श्री.रामदास भांड साहेब,श्री.जायनुरे साहेब.तसेच पोलीस विभागाचे श्री.जुने साहेब व ग्रा.पंचायत पेठवडज चे ग्रामसेवक श्री.शिंदे साहेब(ग्रा.पं.सचिव)व सर्व कर्मचारी,आणि गावातील नागरिक,शेतकरीवर्ग,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी ग्रा.पं.ग्रामसेवक/सचिव यांनी सदरील ठराव व अर्ज वरिष्ठांना पाठपुरावा करू असे सांगितले व अध्यक्ष यांच्या परवानगीने ग्रामसभा संपन्न झाल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *