कंधार (दिगांबर वाघमारे)
तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या हाळदा सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे,शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे,शेकापचे मराठवाडा अध्यक्ष विक्रांत दादा शिंदे, युवा नेते रोहित रावसाहेब पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाळदा सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या समर्थकांचा दणदणीत विजय झाला असून हाळदा सेवा सहकारी सोसायटी आमदार श्यामसुंदर शिंदे समर्थकांच्या ताब्यात आली आहे .
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या समर्थकांच्या पॅनल मधील १३पैकी १३ जागेवर आमदार शिंदे यांच्या समर्थकांनी निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे, या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे पुतणे रोहित रावसाहेब पाटील शिंदे सह नवनिर्वाचित सदस्यपदी चक्रधर बालाजी जळबा, ढोणे आत्माराम दत्ताराम, दयापवाड व्यंकटी नारायण, बुरकुले कमलकिशोर चंद्रराव, यलमीटवाड बळीराम श्रीराम, शिंदे दिगंबर व्यंकटराव, शिंदे शिवाजी किशन, शिंदे चौत्राबाई सुभाष, शिंदे भागवतबाई विक्रम, पवार रावसाहेब राजाराम, कुराडे शिवराज गणपतराव, राठोड धनाजी हरिश्चंद्र, वरील सर्व नवनिर्वाचित सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्यांचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व समस्त गावकरी मंडळी चे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी हाळदा येथील ग्रामस्थांनी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.