स्व .गोपिनाथराव मुंडे यांचे  लोहा तालुक्यातील मौजे माळाकोळी येथे होत असलेल्या  स्मारकाची पाहणी 

लोहा ; प्रतिनिधी

 

 

स्व .गोपिनाथराव मुंडे यांचे  लोहा तालुक्यातील मौजे माळाकोळी येथे होत असलेल्या  स्मारकाची पाहणी

 

 

सतत चाळीस वर्षाच्या अविरत संघर्ष आणि चळवळीतून घडलेला लढवय्या लोकनेता म्हणून इतिहासात गोपीनाथ मुंडे हे नाव अजरामर राहील. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना महाराष्ट्रासह केंद्रिय राजकारणात अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, उद्योग , सहकार आदी क्षेत्राला सामाजिक आशय देणारा हा संघर्षयात्री सतत जनसामांन्याच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत राहिला. अनेकांची राजकीय पुनर्वसने करून त्यांना सत्तेचा गुलाल लावला. संघर्ष हेच त्यांच्या जिवनाचे मूलगामी सूत्र होते.

 

 

एका सामान्य शेतकरी कुटूंबातील मुलगा, जि.प.. सदस्य, आमदार, विरोधी पक्ष नेता, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री सक्षम गृहमत्री , ,राष्ट्रीय सचिव, खासदार ,संसदीय उपनेते, लोकलेखा समिती अध्यक्ष, केंद्रिय ग्राम विकासमंत्री, भाजपाला बहुजनां ची पार्टी बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. लोकनेता या अढळ पदाला पोहचलेला एक प्रभावी नेता म्हणजे मा. गोपिनाथराव मुंडे साहेब. मुंडे साहेब यांचे स्मारक लोहा तालुक्यातील मौजे माळाकोळी येथे होत असुन त्या स्मारक बांधकामाची आज सामाजिक कार्यकर्त्या तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महीला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ.आशाताई शिंदे यांनी पाहणी केली.

 

 

 

याप्रसंगी चंद्रसेन पा.गौंडगावकर मा.जि.प.सदस्य नांदेड, केशराव तिडके,जनार्दन तिडके,निखील मस्के माजी उपसरपंच, लक्ष्मण तिडके,आरुण सोनटक्के,लक्ष्मण केंद्रे, उपसरपंच नागेश पा.हिलाल शेकाप लोहा ता.अध्यक्ष, सुधाकर सातपुते, सचिन कल्याणकर व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *