धनज बु.ता. लोहा येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब उपस्थित राहून सर्वप्रथम दर्शन घेतले. यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सप्ताह समाप्तीच्या शुभेच्छा देत गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेबांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पंजाब पाटील माळेगावे,माजी सरपंच पप्पू भुरे,माधवराव शिंदे सह कार्यकर्ते गावकरी व महिला मंडळ उपस्थित होते.