प्रस्थापित घराणेशाही हटाव लोहा कंधार बचाव माजी सैनिक संघटनेचा नारा ; मी एक साधा कार्यकर्ता असून सर्वसामान्यांचं काम करण्यासाठीच विधानसभा लढतोय – बालाजी चुकलवाड

 

 

*कंधार प्रतिनीधी- संतोष कांबळे*

प्रस्थापित घराणेशाहीला मुक्त करून या तालुक्याचा विकास करून राज्यात लोहा-कंधार मतदारसंघाची आणखी वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्धार केला आहे म्हणून माजी सैनिक संघटनेच्या वतीने मी उमेदवारी दाखल केली असे बालाजी चुकलवाड म्हणाले .

मागील तीन ते चार वर्षापासून मतदार संघात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून नावलौकिकास आलेली माजी सैनिक संघटना आगामी होणारी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवीत आहे व त्यांची निशाणी अंगठी आहे.गेल्या तीन-चार वर्षापासून माजी सैनिक संघटना लोहा-कंधार मतदार संघामध्ये सैनिकांचे प्रश्न सोडवत सामान्य जनतेचे पण प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.

तालुक्यामध्ये अत्यावश्यक लाईट, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या बाबींवर कुठलाच विकास झालेला नसून एवढंच नव्हे तर ज्यांनी आजी-माजी खासदार आमदारांनी अनेक वर्षे सत्ता भोगली त्यांच्याच गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही त्यांना शिक्षण देता आले नाही त्यांना आरोग्य देता आले नाही हे कंधार तालुक्याचे दुर्दैव .

बालाजी चुकलवाड
म्हणाले की, “मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, लोहा कंधार मतदारसंघातील सुजाण मतदार देखील माझ्या सोबत मोठ्या संख्येने आहेत. आम्ही सातत्यानं जनतेसोबत उभे असतो आणि मला खात्री आहे की जनताही आम्हाला साथ देतील.” तसेच मी एक साधा कार्यकर्ता असून सर्वसामान्यांचं काम करण्यासाठीच लढतोय, असंही बालाजी चुकलवाड म्हणाले.

 

 

*
मागील चाळीस वर्षापासून कंधार लोहा मतदारसंघाला अंधारात ढकलणाऱ्या प्रस्थापिताना, तसेच मतदार संघातील भोळ्या भाबड्या जनतेला जातीजातीमध्ये धर्मामध्ये गुंतवून ठेवणाऱ्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही. त्यासाठी सुजान नागरिकांनी, तरुण मतदारांनी मला संधी द्यावी. येणाऱ्या २० तारखेला अनुक्रमांक १० वरील अंगठी या निशाणी समोरील बटन दाबून मा. सैनिक संघटनेचे बालाजी चुकलवाड यांना विजयी करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *