कंधार ;
महाराष्ट्र राज्यात मन्याड खोरे म्हणजे जणु रत्नांची खाण आहे.राजकिय,शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक क्षेत्रात नावारुपास आले आहे.सध्या निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागु असल्यामुळे कार्तिकी एकादशीस
श्री विठ्ठल व श्री रुक्माईमातेची शासकीय महापूजा कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा,ता.कंधार नगरीचे भूमिपुत्र, डॉ. चंद्रकांतजी सुलोचना लक्ष्मणराव पुलकुंडवार (भाप्रसे), विभागीय आयुक्त पुणे व मानाचे मानकरी यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी एकमतशी बोलताना दिली.कार्तिकी शुद्ध प्रबोधनी एकादशी दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा संपन्न होत असते. यावर्षी सन २०२४ मध्ये कार्तिकी एकादशी मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी आहे.
या दिवशी पहाटे २ वाजून २० मिनिटानी श्री विठ्ठल व रुक्माईमाता या देवतांची राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे मानकरी यांच्याहस्ते सपत्नीक शासकीय महापूजा आयोजित करण्यात येते. तथापी राज्याच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणते उपमख्यमंत्री महोदयांच्याहस्ते पुजा करावी. हा प्रश्न आणि आचार संहितेमुळे महाराष्ट्रातील एका निराळी विणकर समाजातील अनमोल रत्न आणि कतृव्यदक्ष विभागीय आयुक्त मा.चंद्रकांत पुलकुंडवार साहेब यांच्या रुपाने मन्याड खोर्याला बहुमान मिळाल्याने सर्वांना आनंद झाला.पुंडलिक वरदे,हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!गजर सर्व वारकरी आणि मन्याड खोर्यातील नागरीक जयघोष करुन मा.डाॅ चंद्रकांतजी सुलोचना लक्ष्मणराव पुलकुंडवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार
दत्तात्रय एमेकर