आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते कौडगाव ता.लोहा येथे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण

 

लोहा ; प्रतिनिधी

काल कौडगाव ता. लोहा येथे लोहा,कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून सभागृह बांधकाम कामाचे लोकार्पण, कर्तव्यदक्ष,कार्यसम्राट आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब म्हणाले की, लोहा,कंधार मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना सौ.आशाताई यांनी गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या विविध विकास कामाचा लेखाजोखा स्पष्ट केला. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब व सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे,माजी सरपंच राजू पाटील कापसिकर,सरपंच पंजाब माळेगावे,सरपंच भगवान घोडके, उपसरपंच हनुमंत पाटील जाधव, सचिन पाटील कुदळकर,माजी सरपंच सुनील भदरगे,
सरपंच कामाजी पाटील भरकडे,गोविंद पाटील कदम,शिवाजी पाटील,सुभाष पाटील, उपसरपंच विलास पाटील,गंगाधर पाटील, सुदाम पाटील कौडगावकर,विठ्ठल पाटील,आनंद कदम, गोविंद दर्शने,भीमराव पाटील,मारुती तेलंगे, सुभाष पाटील,
ओम वानखेडे सह कार्यकर्ते, गावकरी व महिला उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *