आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत पंढरपूरमध्येआंदोलन!


आठ ते दहा दिवसात सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतची नियमावली तयार करण्याचे राज्य सरकारचे आश्वासन? 


 #सोलापूर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलन केलं,  त्यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करुन आंदोलन केलं. यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचं आंदोलन करणारच अशी भूमिका घेतली होती.


ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे जाहीर आभार, काल रात्रीपर्यंत इथंपर्यंत येऊ देतील का याबद्दल शंका होती : प्रकाश आंबेडकर

आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलनआंबेडकरांना त्यांच्या मागणीवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्याचं आश्वासन देत आंदोलन न करण्याची विनंती केली :गृहमंत्री अनिल देशमुख
पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह वारकरी सेनेचे पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अशा 11 लोकांना मंदिरात सोडले


◾️प्रकाश आंबेडकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा नाहीच, आंबेडकरांनी दीड तास वाट बघितली, प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहावरुन आंदोलनस्थळाकडे रवाना,

 ◾️आंबेडकर आंदोलनावर ठाम, शांततेत आंदोलन व्हावं यासाठी पोलिसांकडून प्रयत्न

◾️आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांचा पाठिंबा, मात्र आंदोलनात सहभागी वारकऱ्यांची संख्या अत्यल्पपंढरपुरात सुमारे आठशे ते एक हजार कार्यकर्ते दाखल, 

◾️प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मोजक्या कार्यकर्त्यांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी पोलिसांनी तयारी, प्रकाश आंबेडकर पोलिसांची विनंती कितपत आणि कशी मान्य करतात यावरच आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार

विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनासाठी अनेक कार्यकर्ते पंढरपुरात दाखल, वंचितच्या कार्यकर्त्यांना पंढरपूरमधील शिवाजी चौकात रोखले होते

 
◾️प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहात पोहोचले, थोड्याच वेळात जिल्हाधिकारीही शासकीय विश्रामगृहात पोहोचणार, त्यांच्याशी चर्चा झाल्यावर प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी जाणार, विश्रामगृहात वारकरी प्रतिनिधीही हजर होते .

सोलापूरमधून वंचितचे कार्यकर्ते पंढरपूरकडे रवाना, खासगी बसेस करुन कार्यकर्ते पंढरपूरच्या दिशेनेप्रकाश आंबेडकर मोहोळ मध्ये पोहोचले. येथून पंढरपूरकडे निघाले असून मध्ये कुठेही थांबले नाहीत.


प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे.” यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवरही सडकून टीका केली.

भाजपने घंटानाद करण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावं आणि मंदिरं खुली करण्याचे आदेश देण्याची मागणी करावी, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.


दरम्यान याआधी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मंदिरं खुली करा अन्यथा पंढरपूरमध्ये आंदोलन करु असा इशारा दिला होता. “दारु, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प. अरुण महाराज बुरघाटे आणि ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला विचारला आहे. यावर राज्य सरकार प्रतिसाद देत नसल्याने 31 ऑगस्टला समस्त वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने पंढरपूरला जमावे,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.

मुख्यमंत्री सोबत काय झाली चर्चा? 


राज्यात लवकरच लोकांसाठी मंदिर,मशीद, बुध्दविहार,जैन मंदिर सुरु केली जातील.त्यासाठी सरकार नियमावली तयार करणार आहे,अशी माहिती  मुख्यमंत्र्यांकडून मिळाली असल्याच प्रकाश आंबेडकर यांनी सांगतील व तसेच 

आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील,असं आश्वासन सरकारने दिलंय. सरकारने आश्वासन पाळले नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात दाखल होऊ.याची नोंद सरकारने घ्यावी.असा इशारा देखील ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला .


#वारकरी_विठुरायाच्या_चरणी .#माऊली #वारकरी ,#yugsakshilive.in,
#वारकरी_विठुरायाच्या_चरणी,#माऊली, #वारकरी  , #Prakashambedkar 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *