आमदार शिंदे,आशाताई, विक्रांत दादा यांनी मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त भेटून दिल्या शुभेच्छा

 

 

कंधार/ प्रतिनिधी/
सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या मुस्लिम समाजात सर्वात पवित्र समजला जाणारा रमजान महिना व रमजान ईद निमित्त लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा कंधार मतदारसंघातील अनेक गावात मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद निमित्त भेटी घेतल्या, यावेळी आमदार शिंदे यांनी किवळा,जोशीसांगवी सह कंधार शहरात विविध ठिकाणी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी रमजान ईद निमित्त उस्माननगर,शिराढोण, किवळा व कंधार शहरातील विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांना भेटून रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या यासह शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस तथा युवा नेते विक्रांत दादा शामसुंदर शिंदे यांनी मतदारसंघात रमजान ईद निमित्त काबेगाव सह कंधार शहरातील विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर,अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष शेख शेरूभाई,शेख सद्दाम, मगदूम भाई, काबेगावचे सरपंच दुलेखा पठाण, उपसरपंच खैरुल्ला पठाण,एजाज भोसीकर,जमीर पठाण, सचिन कुदळकर, व्‍यंकटी आढाव, सिकंदर शेख, शेख मुर्तुजा, शेख सोहेल, शेख अल्ताफ,सह मुस्लिम बांधव, पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *