सामाजिक सलोखा राखून भीम जयंती मिरवणूक शांततेत पार पाडा – सुधाकर अण्णा कांबळे

 

कंधार : प्रतिनिधी 
जगातील १५२ राष्ट्रसह भारतामध्ये डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केले जाते. त्याचबरोबर देशातील विविध राज्यात सर्व समाजातील आणि अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तींनी डॉक्टर आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आत्मसात करून सामाजिक सलोखा राखला पाहिजे आणि आपापल्या स्तरावर भीम जयंती मिरवणूक शांततेत पार पाडावे असे मत कंधार नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे यांनी मौजे गुंटूर येथे बोलताना आपले मत प्रकट केले.

कंधार तालुक्यातील मौजे गुंटूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २३ एप्रिल सकाळी नऊ वाजता कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुधाकर अण्णा कांबळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच योगेश उप्पे, उपसरपंच प्रतिनीधी योगेश मुंडकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन चिलपिपरे, संग्राम शिंदे, लक्ष्मण मुंडकर, माजी सदस्य शिवाजी बिजले विलास सोनकांबळे, महादेव सोनकांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे कंधार तालुका अध्यक्ष विलास कांबळे, गावातील प्रमुख, सेवा सोसायटीचे चेअरमन आदी उपस्थिती होते.

 

पुढे बोलताना कांबळे म्हणाले की सामाजिक स्तरावर इतर मागासवर्गीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानात्मक अधिकार करण्यासाठी बराच उशीर झाला त्यामुळेच ग्रामीण भागात आजही भीम जयंती मिरवणूक काढण्यासाठी छोटे मोठे वाद निर्माण होत असतात ते दूर सारून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ आंबेडकरांची जयंती केवळ बौद्ध समाजानेच नाहीत गावातील इतर समाजांनी एकत्र येऊन मोठ्या समूहाने एक दिलाने सर्व मतभेद विसरून साजरी करावे असेही सामाजिक आवाहन सुधाकर अण्णा यांनी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *